उल्कानगरीत ग्राऊंड फ्लोवरवरील स्टोअर रूमला लागलेल्या आगीत १४ वर्षीय बालकाचा गुदमरून मृत्यू तिघेजण अत्यवस्थ

Foto
औरंगाबाद - औरंगाबाद शहरातील उल्कानगरी परिसरात खिवंसरा पार्क येथील एका इमारतीच्या ग्राऊंड फ्लोवरवरील पथदिव्यांच्या स्टोअर रूमला आग लागून वरच्या मजल्यावरील कुटुंब धुराने गुदमरून अत्यवस्थ झाले. यात 14 वर्षीय मुलाचा गुदमरल्याने मृत्यू झाला. कुटुंबातील बालकाला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीचे कारण स्पष्ट नसून ही घटना गुरुवारी पहाटे पाच वाजून वीस मिनिटांच्या सुमारास घडली. 


अग्निशामक दलाकडून प्राप्त माहितीनुसार,  संस्कार शामसुंदर जाधव 14,  रा. उल्कानगरी, औरंगाबाद असे मृताचे नाव आहे. मृत मुलाचे वडील शामसुंदर बाबासाहेब जाधव (45),  आई सविता जाधव (40),  बहीण संस्कृती (20) अशी  अत्यवस्थ झालेल्या कुटुंबातील इतरांची नावे आहेत.  उल्कानगरीतील  खिवंसरा पार्क या प्रशस्त परिसरात प्लॉट क्रमांक 76,  येथे असलेल्या इमारतीत घरमालक अविनाश पाठक यांच्याकडे  शामसुंदर जाधव भाड्याने राहतात. जाधव यांचा पथदिव्यांचा व्यवसाय आहे. 

              खिंवसर पार्क येथील पाठक यांच्या घरात शामसुंदर जाधव हे भाड्याने राहतात. त्यांच्या इलेक्ट्रॉनिक साहित्याचा व्यवसाय आहे. याच घराच्या खालच्या मजल्यावर त्यांनी इलेक्ट्रोनिक साहित्याचे गोडाऊन केले आहे. बुधवारी रात्री या गोडाऊन मध्ये त्यांनी माल उतरवला होता. बुधवारी पहाटे अचानक या गोडाऊनला आग लागली आणि धुराचे लोट त्यातून बाहेर पडले. हा धूर वरच्या मजल्यावर राहत असलेल्या जाधव यांच्या घरात पोहंचला. काही क्षणात संपूर्ण घरात मोठ्याप्रमाणावर धूर झाल्याने जाधव कुटुंबास बाहेर पडण्यास संधी मिळाली नाही. पहाते गोडाऊनला आग लागल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस व अग्निशमन दलास माहिती दिली. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरु केले.
                                                   



               खालच्या मजल्यावरील गोडाऊनमधील आग विझवून अग्निशमन दलाने घरात प्रवेश केला. यावेळी घरामध्ये १४ वर्षीय संस्कार जाधव याचा गुदमरून मृत्यू झाल्याचे तर जाधव यांचे संपूर्ण कुटुंब अत्यवस्थ असल्याचे आढळून आले. यानंतर पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी शामसुंदर जाधव त्यांच्या पत्नी सविता व मुलगी संकृती यांना हेडगेवार रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker